Anuradha Vipat
ग्रीन टी अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी ती अत्यंत फायदेशीर मानली जाते.
ग्रीन टीचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पिणे आवश्यक आहे.
ग्रीन टी मधील 'कॅटेचिन्स' चयापचय क्रिया वेगवान करतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने जळते.
ही शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते आणि रक्तवाहिन्यांचे रक्षण करून हृदयविकाराचा धोका कमी करते.
हे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सकाळी नाश्ता केल्यानंतर १ तासाने ग्रीन टी पिणे सर्वोत्तम मानले जाते.
वर्कआउट किंवा व्यायाम सुरू करण्याच्या ३० ते ४० मिनिटे आधी ग्रीन टी प्यायल्याने शरीराची उर्जा वाढते आणि फॅट बर्निंग प्रक्रिया वेगाने होते.