Anuradha Vipat
हिवाळ्याच्या दिवसांत उकडलेल्या तुरीच्या शेंगा खाणे शरीराला उबदारपणा देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
तुरीच्या शेंगा हिवाळ्यात शरीराला उबदारपणा का देतात आणि त्यांचे इतर फायदे काय आहेत, ते जाणून घेऊया.
तुरीच्या शेंगांमध्ये नैसर्गिकरित्या उष्णतावर्धक गुणधर्म असतात.
आयुर्वेदानुसार तुरीच्या उकडलेल्या शेंगा खाल्ल्याने शरीराला आतून उबदार वाटते.
तुरीच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. प्रथिने शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात.
तुरीच्या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
उकडलेल्या तुरीच्या शेंगा हा एक पौष्टिक आणि तरीही हलका नाश्ता आहे.