Green Gram Soup Recipe : उन्हाळ्यात करा गरमागरम हिरव्या मुगाचं कढण पाहा रेसिपी

Anuradha Vipat

हिरव्या मुगाचे कढण

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पचायला हलके असे हिरव्या मुगाचे कढण अतिशय पौष्टिक असते.

Green Gram Soup Recipe | agrowon

साहित्य

रात्रभर भिजवलेले हिरवे मूग, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे व मोहरी, हिंग व हळद , कोकम किंवा लिंबाचा रस, गूळ, मीठ, ताजी कोथिंबीर, तूप.

Green Gram Soup Recipe | agrowon

कृती

भिजवलेले हिरवे मूग पुरेसे पाणी घालून चांगले मऊ शिजवून घ्या. शिजलेले मूग रवीने किंवा चमच्याने थोडे घोटून घ्या.

Green Gram Soup Recipe | agrowon

फोडणी

एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून तडतडू द्या.

Green Gram Soup Recipe | agrowon

मसाले

फोडणीत आलं-लसूण पेस्ट आणि हळद घालून थोडा वेळ परता. घोटलेले मूग या फोडणीत ओता. चवीनुसार मीठ, कोकम आणि थोडा गूळ घाला.

Green Gram Soup Recipe | agrowon

सजावट

गॅस मध्यम आचेवर ठेवून कढणाला २-३ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या. वरून ताजी कोथिंबीर पेरा. 

Green Gram Soup Recipe | agrowon

मुगाचे कढण

गरमागरम मुगाचे कढण तुम्ही सूपप्रमाणे पिऊ शकता किंवा भातासोबतही घेऊ शकता. 

Green Gram Soup Recipe | agrowon

Arm Fat Exercises : तुमचेही दंड दिसतात का जाड? मग हे वर्कआऊट नक्की करा

Arm Fat Exercises | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...