Team Agrowon
बाजारात हिरव्या मिरचीच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचे दिसते. बाजारातील आवक स्थिर आहे.
काही बाजारात आवक वाढल्याने दरात नरमाई देखील दिसून आली.
सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
पावसाने मिरची पिकाला मोठा तडाखा दिला.
अनेक भागात पीक आडवे झाले. त्यामुळे हा माल बाजारात येत आहे. पण पुढील काळात पिकसाठी पुरेशे पाणी अनेक भागात उपलब्ध नसेल.
परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.