sandeep Shirguppe
रोज नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
तुम्ही नेहमी लाल सफरचंद खाताय, मात्र, तुम्हाला हिरव्या सफरचंदाबद्दल काही माहित आहे का?
लाल सफरचंदाप्रमाणेच हिरव्या सफरचंदाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात.
हिरव्या रंगाच्या सफरचंदात कॅल्शिअम, लोह, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो.
हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम फायदेशीर आहे. हिरव्या सफरचंदात हे घटक असल्याने नियमित सेवन करणे फायद्याचे ठरते.
एका संशोधनांनुसार नियमितपणे हिरव्या सफरचंदाचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराची लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.
हिरव्या सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि पाणी आढळून येते. आपल्याला फार भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
हिरवे सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीरातील मेटॅबॉलिजम सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.