Anuradha Vipat
स्वयंपाक घरात अशा अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.
मेकअप काढण्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता करणे आवश्यक असते. तर आज आपण पाहणार आहोत की मेकअप काढण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरातील कोणत्या गोष्टी वापरू शकता
मेकअप काढण्यासाठी तुम्ही कच्चे दूध वापरू शकता. दूध त्वचेला स्वच्छ करण्यासोबतच तिला हायड्रेट करते
तुम्ही काकडीचा रस मेकअप रिमूव्हर म्हणून देखील वापरू शकता. यामुळे त्वचेवरील सूज कमी होते आणि त्वचा फ्रेश आणि चमकदार होते.
नारळ तेल हे त्वचेसाठी देखील एक चांगले नैसर्गिक घटक आहे. याच्या मदतीने चेहऱ्याला मसाज करता येते
जर तुम्हाला तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करायची असेल तर दही हा एक उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे.