Grape Disease Management: पावसाळ्यात द्राक्षातील करपा, केवडा, तांबेरा रोखण्यासाठी करा हे उपाय!

Swarali Pawar

पावसाळ्यात रोगांचा धोका वाढला!

दमट आणि पावसाळी हवामानामुळे द्राक्ष बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. वेळीच उपाय केल्यास बागेचे मोठे नुकसान टाळता येते.

Bacterial Blight of Grapes | Agrowon

करपा रोगावर काय कराल?

जीवाणूजन्य करपासाठी कासुगामायसिन + कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी करा. बुरशीजन्य करपासाठी कार्बेन्डाझिम किंवा थायोफिनेट मिथाइल वापरा.

Karpa in Grapes | Agrowon

केवडा रोगाचा धोका वाढतोय?

दमट हवामानात केवडा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू शकतो. नियंत्रणासाठी एम-४५ किंवा कॉपर हायड्रॉक्साइडची फवारणी करा.

Kevada Disease on Grape | Agrowon

वेलींची वाढ आटोक्यात ठेवा

अतिपावसामुळे वेलींची शाकीय वाढ जास्त होत असेल तर उपाय करा. हेक्साकोनाझोल किंवा डायफेनकोनाझोलची फवारणी फायदेशीर ठरते.

Dense Canopy of Grape | Agrowon

भुरी दिसताच त्वरित उपाय करा

भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास एम-४५ वापरा. या अवस्थेत फवारणीपेक्षा डस्टिंग अधिक प्रभावी ठरते.

Downy mildew of Grapes | Agrowon

तांबेरा रोगावर लक्ष ठेवा

शेतात २४ तासांपेक्षा जास्त पाणी साचले असेल तर तांबेराची लक्षणे तपासा. लक्षणे दिसल्यास क्लोरोथॅलोनीलची फवारणी करा.

Anthracnose of Grapes | Agrowon

जैविक बुरशीनाशकांचाही वापर करा

बॅसिलस सब्टिलिसची फवारणी आणि ट्रायकोडर्माचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे जमिनीतील बुरशीजन्य रोग कमी होण्यास मदत होते.

Bio Fungicides | Agrowon

ही चूक करू नका!

सध्या विनाकारण सिस्टेमिक बुरशीनाशकांचा वापर टाळा. रोगानुसार योग्य बुरशीनाशक निवडूनच फवारणी करा.

Fungicide for Grapes | Agrowon

Soybean Protection: अतिवृष्टीनंतर सोयाबीनमध्ये मुळकुज-खोडकुजचा धोका! वेळीच करा उपाय

अधिक माहितीसाठी...