sandeep Shirguppe
घराघरांमध्ये सहज उपलब्ध असणारी खडीसाखर अनेक औषधी गुणांनी युक्त आहे.
आयुर्वेदानुसार खडीसाखर थंड गुणधर्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे.
खडीसाखरेत व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो ॲसिड असतात.
भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी १२ खडीसाखरेतून मिळू शकते.
एका पंधरा ग्रॅंमच्या खडीसाखरेतून तुमच्या शरीराला जवळपास ६० कॅलरीज मिळतात.
जर तुम्हाला सतत कफ अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता.
अशक्तपणा जाणवत असेल तर दुधातून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही की खडीसाखरेमुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव त्वरित थांबू शकतो.