Anuradha Vipat
पाणी बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन ठिबक सिंचनासाठी अनुदान उपलब्ध करून देत आहे
राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचनावर विशेष अनुदान योजना सुरू केली आहे.
योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत ‘टॉप अप’ स्वरूपात राबवली जाणार आहे
शेतकऱ्यांना इतर सिंचन योजनांचा लाभ घेतल्यानंतरच अनुदानाचा फायदा मिळणार आहे
या योजनेत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी जास्तीत जास्त 97,000 रु तर तुषार सिंचनासाठी 47,000 पर्यंत अनुदान मिळू शकते.
शेतकऱ्यांनी प्रथम ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’ आणि ‘मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना’ यांचा लाभ घेणे बंधनकारक आहे.
ठिबक व तुषार पद्धतीमुळे पाणी बचत होईल