Capsicum : शिमला मिरचीतून मिळेल बंपर उत्पादन; या लावा जाती

Aslam Abdul Shanedivan

ढबू मिरची

सिमला मिरची म्हणजेच आपल्याकडे तिला ढबू मिरची असे म्हटले जाते. जी वर्षभर घेता येते.

Capsicum | Agrowon

वर्षभर मागणी

सिमला मिरची बाजारात वर्षभर मागणी कायम असते. त्यामुळे पेरणी करताना चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांची पेरणी करावी लागते.

Capsicum | Agrowon

व्हिटॅमिनचे मुबलक प्रमाण

सिमला मिरचीत फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के हे मुबलक प्रमाणात आढळतात

Capsicum | Agrowon

सिमला मिरची सर्वोत्तम वाण

सिमला मिरची पेरायची असेल तर बंपर उत्पादन देणाऱ्या इंद्रा, कॅलिफोर्निया वंडर, अर्का मोहिनी आणि ओरोबेल यांसारख्या वाणांची निवड करावी. यातील इंद्रा या वाणाची पेरणी केल्यास २ महिन्यातच पीक तयार होते. एका एकरात आपल्याला 110 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.

Capsicum | Agrowon

सोलन हायब्रिड 2

सोलन हायब्रिड 2 बंपर उत्पन्नासाठी ओळखले जाते. हे संकरित वाण असून याचे पीक २ ते ३ महिन्यात तयार होते. एका एकरात 135 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते.

Capsicum | Agrowon

कॅलिफोर्निया वंडर

कॅलिफोर्निया वंडर हे आडीच महिन्यात तयार होते. याची उत्पादन क्षमता 125 ते 150 क्विंटल प्रति एकर आहे.

Capsicum | Agrowon

ओरोबेल

हे वाण थंड हवेतील प्रदेशासाठी तयार करण्यात आली आहे. याची शेती उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात केली जाते. या मिरचीचा रंग पिवळा असून यात उच्च रोग प्रतिकारशक्ती असते.

Capsicum | Agrowon

Banana Crop Insurance : केळीला पीक विमा नाही, पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार