Deepak Bhandigare
भू- राजकीय तणावासह अमेरिका-चीन व्यापार संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, आशिया आणि मध्य पूर्वेतील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत
त्यांनी या वर्षी जागतिक स्तरावर १ हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त सोने खरेदी केली आहे
टॅरिफ, निर्बंधांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत होतात, परिणामी सोन्याला झळाळी मिळते
सणासुदीत मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढतात
जगभरातील किरकोळ गुंतवणूदार गोल्ड ईटीएफमध्ये अब्जावधीची गुंतवणूक करत आहेत
जेव्हा बाजारात अनिश्चितता असते तेव्हा शेअर, बाँडपेक्षा सोन्यातील गुंतवणूक अधिक विश्वासार्ह मानली जाते
चलनात घसरण झाली तरी सोन्याचे मूल्य कायम राहील, हा विश्वास ठेवून गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात