Team Agrowon
दुधाला पूर्ण अन्न संबोधले जाते. अर्थात, दूध म्हटल्यानंतर आपल्याला फक्त गायीचे दूध किंवा म्हशीचे दूध आठवते. खरं तर हजारो वर्षांपासून शेळीच्या दुधाचा वापर आपल्या आहारामध्ये केला जात होता. ग
गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधामध्ये ऊर्जा, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात तर कर्बोदकामधील महत्त्वाचा घटक म्हणजे लॅक्टोज कमी प्रमाणात असते.
शेळीच्या दुधात जीवनसत्त्व अ, क, ड तसेच थायमिन, नायसिन, पायरीडॉक्सिन, कोलीन ही जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. तसेच कॅल्शिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम ही खनिजेही गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात असतात.
स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असली तर त्याचे सूक्ष्मकण असल्यामुळे दुधामध्ये ते एकजीव होतात. गायीच्या दुधाला स्निग्ध पदार्थयुक्त मलई येते तसे शेळीच्या दुधाचे होत नाही.
शेळीच्या दुधात प्रथिने जास्त प्रमाणात असले तरी त्यांची एका विशिष्ट प्रकारची शृंखला असल्यामुळे ते पचनासाठी सोपे असतात. त्यांची अत्यंत लहान ते मध्यम प्रकारची शृंखला असल्यामुळे पचनीय विकरांद्वारे त्यांचे लवकर विघटन होऊन ते शरीराला पूर्णपणे उपलब्ध होतात.
गायीचे दुधातील प्रथिने पचायला आठ ते दहा तास लागतात तर शेळीचे दूध फक्त २० ते २५ मिनिटांमध्ये पचते. अनेकांना गायीच्या दुधामुळे पोटाचा त्रास होतो.
इम्युनोग्लोबिन हा घटक मानवी दुधापेक्षा शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात असतो. याचमुळे आईच्या दुधानंतर लहान मुलांना शेळीचे दूध द्यावे, असे आपले पूर्वज सांगत होते.
Chinese Garlic : बाजारात भाव खातोय चिनी लसूण