Aslam Abdul Shanedivan
लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी दूध अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे गाईचे किंवा म्हशीचे दूधास अनेकांची पसंती असते. Agrowon
गाई किंवा म्हशीच्या दूधात कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. पण अनेकांना शेळीच्या दूधाचे फायदे माहित नाहीत
आयुर्वेदानुसार शेळीचे दूध गाय आणि म्हशीच्या दुधापेक्षा हलके असते. म्हणूनच ज्यांना गाय आणि म्हशीचे दूध पचता येत नाही त्यांच्यासाठी शेळीचे दूध हा उत्तम पर्याय आहे.
याशिवाय डेंग्यू तापामध्ये प्लेटलेट्स कमी असल्यास शेळीच्या दुधाचे सेवन करणे सर्वात फायदेशीर मानले जाते.
शेळीच्या दुधात गाईच्या दुधासारखेच पोषक घटक असतात. पण त्यात कॅलरीजचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा किंचित जास्त असते. जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीच्या मते, शेळीचे दूध केवळ आपली चयापचय क्रिया सुरळीत करत नाही तर ते पचण्यासही सोपे आहे.
शेळीचे दूधाचे सेवन त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, दूध आपल्या त्वचेसाठी सक्रिय घटक म्हणून काम करते.