Anuradha Vipat
गोव्याला जाणे आणि तिथे एन्जॉय करणे हा महागडा प्लॅन असायलाच हवा असे नाही.
योग्य नियोजनाने तुम्ही ₹५,००० ते ₹७,००० प्रति व्यक्ती (३ ते ४ दिवस) अशा कमी बजेटमध्ये देखील गोव्याची मस्त ट्रिप करू शकता.
गोव्यासाठी ट्रेन हा सर्वात बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. मुंबई किंवा पुण्याहून जाणाऱ्या Mandovi Express, Konkan Kanya, किंवा Matsyaganda Express च्या स्लीपर क्लासचे तिकीट काढा .
जर ट्रेनचे तिकीट मिळाले नाही, तर सरकारी किंवा खासगी स्लीपर बसेस (अंदाजे ₹८०० - ₹१,२००) उत्तम पर्याय आहेत.
जर तुम्ही मित्रांसोबत किंवा एकटे जात असाल, तर 'हॉस्टेल्स' हा सर्वोत्तम पर्याय आहे. तिथे तुम्हाला एका रात्रीसाठी ₹४०० ते ₹८०० मध्ये डोर्मिटरी मिळते.
उत्तर गोव्यातील कळंगुट-बागा भागात हॉटेल्स महाग असतात. त्याऐवजी अंजुना, वागातोर किंवा आरंबोल भागात स्वस्त होमस्टे किंवा रूम्स मिळतात.
गोव्यात लोकल टॅक्सी अत्यंत महाग आहेत. त्यामुळे स्टेशनवर उतरताच स्कूटी/बाईक भाड्याने घ्या. बाईकचे भाडे साधारणपणे ₹३5० ते ₹५०० प्रति दिवस असते यामुळे तुमचा टॅक्सीचा हजारो रुपयांचा खर्च वाचेल.