Anuradha Vipat
भगर हा केवळ उपवासाचाच एक लोकप्रिय पदार्थ नसून, नॅचरली ग्लुटेन-फ्री असलेला एक उत्कृष्ट सुपरफूड आहे.
ग्लुटेनची ॲलर्जी असलेल्यांसाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी भगर हा गव्हाला आणि पांढऱ्या तांदळाला एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे.
भगरमध्ये उपजतच ग्लुटेन नसून ते पचायला अत्यंत हलके असते. त्यामुळे सिलियाक आजार किंवा ग्लुटेन इनटॉलरन्सचा त्रास असलेल्या लोकांसाठी भगर हा सर्वोत्तम आहार आहे.
भगरमध्ये डायट्री फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
गव्हाच्या किंवा पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत भगरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे भगर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
नियमित किंवा उपवासाला भगरचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि अशक्तपणा दूर होतो.
यातील उच्च फायबर घटकांमुळे पोटाचे आरोग्य सुधारते. उपवासाच्या दिवसांत नॅचरल स्टार्चमुळे होणारी बद्धकोष्टता आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या भगर खाल्ल्याने दूर होतात.