Mahesh Gaikwad
चॉकलेट खायला तर सर्वांनाच आवडते, पण डार्क चॉकलेट फक्त खाण्यासाठीच नाही, तर तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे.
डार्क चॉकलेटमध्ये फ्लावोनॉईड्स हा घटक असतो, जो त्वचेचे वृद्धत्व रोखण्यास मदत करतो आणि नैसर्गिक तेज वाढवते.
डार्क चॉकलेटचे खाल्ल्यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.
डार्क चॉकलेट अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून त्वचेचे नैसर्गिक संरक्षण होते. यामुळे त्वचेचा काळवंडण्यापासून बचाव होतो.
डार्क चॉकलेट खाल्लाने त्वचा हायड्रेट राहते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि रखरखीतपणा कमी होतो.ृ
डार्क चॉकलेटमध्ये मूड बूस्टिंग कंपाऊंड्स असतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
डार्क चॉकलेट पावडरमध्ये मध आणि दूध मिसळून फेसपॅक तयार करू शकता. यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि तजेलदार होते.