Team Agrowon
'बर्कहोल्डोरिया मालेई' या जिवाणूमुळे होणारा ग्लँडर आजार संसर्गजन्य आणि जीवघेणा आहे. तो मुख्यत: घोडे, गाढवे, आणि खेचरे यांना होतो.
हा आजार केवळ प्राण्यांपुरता मर्यादित नसून, तो माणसांनाही होऊ शकतो. म्हणून त्याला झुनोटिक आजार असेही म्हणतात.
नाकातून हिरवट-पिवळा किंवा रक्तमिश्रित स्त्राव, फुफ्फुसात गाठी व खोकला, तर त्वचेवर गाठी आणि पूयुक्त व्रण दिसतात.
नाकाची जळजळ आणि स्त्राव होतो. डोळ्यांमधून पाणी येते. त्वचेवर फोड/जखमा होतात. खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखते आणि न्यूमोनिया होतो.
दूषित अन्न-पाणी, बाधित प्राण्याचा संपर्क आणि अस्वच्छ उपकरणांमुळे ग्लँडरचा प्रसार होतो.
बाधित प्राण्याच्या त्वचेवरील जखमांद्वारे किंवा स्त्रावाच्या संपर्कातून माणसांना प्रसार. बाधित धुळ किंवा कण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करु शकतात.
प्राथमिक तपासणीसाठी ELISA, तर पुष्टीसाठी CFT आणि PCR चाचण्या केल्या जातात.
गोठा, पाण्याची भांडी आणि खाद्यपात्रांची नियमित स्वच्छता ठेवावी. आजारी प्राण्यांचे विलगीकरण करावे, बाधित आणि निरोगी प्राण्यांसाठी वेगवेगळे व्यक्ती नेमावे.
बाधित प्राण्यांच्या स्त्राव आणि जखमांना स्पर्श करु नका. नियमित वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. बाधित प्राण्यांशी संपर्क आल्यास लगेच तपासणी करुन घ्यावी.