Aslam Abdul Shanedivan
अनेकांच्या दिवसाची सुरूवात ही गरम पाणी, हर्बल चहा किंवा चहाने होते
तर अनेक लोक हे जीम, मॉर्निंग वॉकला जाऊन आल्यानंतर हर्बल चहा किंवा हर्बल पेय घेतात.
हे हर्बल चहा किंवा हर्बल पेय हे खिशाला न परवडणारे असतात. त्याऐवजी आल्याचा चहा घेतल्यास त्याचे फायदे फार आहेत.
आल्याच्या चहाचे फायदे अनेक असून त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
तर हा चहा पोटाशी संबंधित आजार कमी करते. बद्धकोष्ठता, आम्लपित्त, फुगवणे आणि पोटदुखी सारख्या समस्या कमी होतात
दररोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा चहा पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ज्यामुळे लठ्ठपणापासून दूर ठेवण्यासह वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते
आल्याचे पाणी किंवा आल्याचा हर्बल चहा पिल्यास रोगांपासून आपला बचाव होतोच. तर दूर प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत होते.