sandeep Shirguppe
केंद्र सरकारने जीआय मानांकनांची यादी प्रसिद्ध केली यामध्ये महाराष्ट्रातील अनेक घटकांना मानांकन मिळाले.
बोरसुरी (ता. निलंगा) येथील तूर डाळ, पानचिंचोली (ता. निलंगा) येथील पटडी चिंच आणि आशिव (ता. औसा) येथील कास्ती कोथिंबिरीला 'जीआय' टॅग मिळाले आहे.
बदलापूर जांभळांसाठी प्रसिद्ध आहे. जांभळाची गुणवत्ताही असल्याने येथील बाजारपेठ एक ब्रँड तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पेणच्या गणेशमुर्ती जगभरात प्रसिद्ध आहेत. यामुळे याची नक्कल करुन अथवा नावाचा वापर करुन गणेशभक्तांच्या फसवणुकीचा प्रकार थांबेल.
लातूरच्या २० ते २५ गावांत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कोथिंबीरचे उत्पादन घेतात. ही कोथिंबीर सुगंधित असल्याने बाजारात याला मोठी मागणी आहे.
लातूर जिल्ह्यात आढळणारी पठडी चिंच हे एक असेच नैसर्गिक वरदान आहे. ही चिंच फक्त लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली या गावातच मिळते.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात बोरसुरी गावात वरण (डाळ) प्रसिद्ध आहे. या भागात बोरसुरी वरणाची मेजवानी करण्यात येते. यासाठी हे प्रसिद्ध आहे.
ज्वारी कडक असल्याने पक्ष्यांना सहजपणे फोडता येत नाही. या भागातील ज्वारी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने दगडी ज्वारी म्हणून प्रसिद्धीस आहे.
धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात दूध उत्पादन होते. यामुळे इथला खवा महाराष्ट्रात फेमस असल्याने याची दखल घेऊन जीआय मानांकन देण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरला येणारे भाविक कवड्यांची माळ घालतात. कवडी स्त्री देवतांचे उपासक आवर्जून वापरतात.