Marathi Saree Look : दसऱ्याला दिसा अस्सल 'मराठी मुलगी'; ट्राय करा या पारंपारिक आणि ट्रेंडी साडी डिझाईन्स!

Anuradha Vipat

साडीची निवड

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अस्सल मराठमोळा आणि पारंपरिक लुक करायचा असेल, तर साडीची निवड सर्वात महत्त्वाची ठरते.

Marathi Saree Look | agrowon

जुनी परंपरा

महाराष्ट्रात सणासुदीला सिल्क आणि काठपदराच्या साड्या नेसण्याची जुनी परंपरा आहे.

Marathi Saree Look | agrowon

साडी डिझाईन्स

या दसऱ्याला स्वतःला खास 'मराठी लुक' देण्यासाठी तुम्ही खालील साडी डिझाईन्स नक्की ट्राय करू शकता.

Marathi Saree Look | agrowon

पेशवाई काठ आणि येवला पैठणी

दसऱ्याच्या पूजेसाठी मोर, पोपट किंवा कमळाची नक्षी असलेला पदर आणि भरगच्च जरी बॉर्डर असलेली येवला पैठणी सर्वोत्तम पर्याय आहे.

Marathi Saree Look | agrowon

पारंपरिक नऊवारी साडी

तुम्ही मस्तानी स्टाईल, ब्राह्मणी किंवा पेशवाई पद्धतीची रेडी-टू-वेअर नऊवारी साडी निवडू शकता.

Marathi Saree Look | agrowon

खण साडी

सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये खणाची साडी प्रचंड लोकप्रिय आहे. ही साडी वजनाने हलकी आणि नेसण्यास अत्यंत सुटसुटीत असते.

Marathi Saree Look | agrowon

गडवाल किंवा नारायणपेठ सिल्क

तुम्हाला जर पैठणीपेक्षा काहीतरी वेगळे हवे असेल, तर बारीक नक्षीकाम असलेली नारायणपेठ साडी किंवा सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातील गडवाल साडी उत्तम पर्याय आहे.

Marathi Saree Look | agrowon

Garba Comfortable Jutis : गरबा खेळताना पायांना त्रास होणार नाही, पाहा कम्फर्टेबल जुती डिझाईन्स

Garba Comfortable Jutis | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...