Sainath Jadhav
गाय आणि म्हशींच्या शेणातून वीज निर्माण करता येते. त्यामुळे बायोगॅस युनिट लावून आज अनेक शेतकरी स्वयंपाकासाठी वीज व गॅस स्वतःच तयार करत आहेत.
शेण, शेती अवशेष आणि पाणी यांचं मिश्रण टाकीत साठवलं जातं. त्यातून तयार होणारा गॅस वापरून स्वयंपाक, लाइट, मोटार यासाठी चालवता येते.
बायोगॅसच्या माध्यमातून घरातील वीज, शेतीपंप, मशिन्स चालतात. तसेच वीजबिलात मोठी बचतही होते आणि वीज खरेदी करावी लागत नाही.
गॅस निघून गेल्यानंतर उरलेलं द्रव शेण खत म्हणून वापरता येतं. हे खत जमीनीची सुपिकता वाढवून पीक उत्पादन सुधारण्यास मदत करते.
बायोगॅस वापरल्यामुळे धूर होत नाही आणि कार्बन उत्सर्जन कमी होतं. ही एक स्वच्छ, हरित आणि नूतन ऊर्जा आहे. याचा फायदा भविष्यात पर्यावरणाला होईल.
बायोगॅसचा वापर केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. घरातील स्वयंपाक गॅस देखील यातून सहज मिळतो.
लघु बायोगॅस युनिटसाठी सुमारे १५ हजार ते ५० हजार रुपये लागतात. तसेच याकरिता सरकारकडून अनुदान मिळू शकते, त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
ज्यांच्याकडे २ ते ३ जनावरे आहेत, असे शेतकरी बायोगॅस युनिट सुरू करू शकतात. जास्त जनावरे असतील, तर मोठं युनिटही लावता येते.
आजच बायोगॅस युनिट लावा आणि घरासाठी वीज, स्वयंपाकासाठी गॅस आणि शेतासाठी खत फुकट मिळवा.