Sainath Jadhav
पूर्ण पिकलेला नैसर्गिक आंबा एकसारखा पिवळा किंवा नारंगी दिसतो. हिरवट किंवा खूप लालसर आंबे कदाचित अजून कच्चे असू शकतात.
आंबा हलकेच दाबा. तो मऊ पण टणक असावा, खूप कडक किंवा जास्त मऊ नसावा. सालावर सुरकुत्या असतील तर आंबा जास्त पिकलेला असतो.
आंब्याच्या देठाजवळ वास घ्या. पिकलेल्या आंब्याला गोड, फळांचा सुगंध येतो. जर वास नसेल किंवा रसायनाचा वास येत असेल, तर तो आंबा घेऊ नका.
भारतात अल्फोन्सो, केसर, तोतापुरी, बंगनपल्ली असे अनेक आंब्यांचे प्रकार आहेत. अल्फोन्सो गोड आणि रसाळ, केसर सुगंधी आणि चवदार, तर तोतापुरी आमरसासाठी उत्तम असतो.
नैसर्गिक पिकवलेल्या आंब्यांमध्ये रस चांगला असतो. तर रासायनिक पद्धतीने पिकविलले आंब्यांचा रस कमी असतो.
खऱ्या आंब्यांंवर साखर वितळते, पण रासायनिक आंब्यांवर ती साखर तशीच राहते. या प्रकाराने सुद्धा तुम्ही आंबा कोणत्या पद्धतीने पिकवला हे ओळखू शकता.
सेंद्रिय, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे खा आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपा.