Geranium Cultivation : एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्ष उत्पादन देणारे जिरॅनियम

Team Agrowon

वेगळ्या पैकापेकी एक असलेलं पीक म्हणजे जिरॅनियम. जिरॅनियम ही एक सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे.

Geranium Cultivation | Agrowon

जिरॅनियम पासून सुगंधी तेल मिळत. या तेलाचा उपयोग सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर तयार करण्यासाठी होतो. अनेक शेतकरी जिरॅनियमची लागवड करतात.

Geranium Cultivation | Agrowon

जिरॅनियम लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीतही जिरॅनियमची लागवड करता येते.

Geranium Cultivation | Agrowon

नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मुख्य शेतात जिरॅनियमची लागवड केली जाते. लागवडीसाठी रोपे ४५ ते ६० दिवसांची असावीत. रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपे चांगली असतात.

Geranium Cultivation | Agrowon

रोपांची लागवड ६० बाय ६० सेंटीमीटर किंवा ७५ बाय ६० सेंटीमीटर अंतरावर करावी.

Geranium Cultivation | Agrowon

लागवडीसाठी अलजीरियन, ट्युनिशिया, रीयूनियन, बोर्बन, हेमंती, बिपुली, कुंती, आय. आय. एच. आर. - ८, उटी, नर्मदा, इजिप्शियन आणि सिम-पवन या जाती उपलब्ध आहेत.

Geranium Cultivation | Agrowon

पानांचा थोडासा रंग हा फिक्कट पिवळसर होण्यास सुरवात झाल्यावर आणि गुलाबासारखा वास येण्यास सुरवात झाल्यावर कापणी करावी. अशा प्रकारे जिरॅनियमची लागवड केल्यानंतर ते तीन वर्षापर्यंत उत्पादन देत राहते.

Geranium Cultivation | Agrowon
आणखी पाहा...