Anuradha Vipat
गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरींचे घरात आगमन होते.
हिंदू धर्म आणि वास्तू शास्त्रानुसार गौरी हे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जातात.
गौरीचे मुखवटे खरेदी करताना काही अत्यंत महत्त्वाचे वास्तू नियम आणि शास्त्रशुद्ध गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
मुखवटा निवडताना देवीचा चेहरा अतिशय प्रसन्न, हसरा आणि शांत असावा. प्रसन्न चेहऱ्याचे मुखवटे घरात सकारात्मकता आणि आनंद आणतात.
आजकाल बाजारात खळी किंवा आकर्षक लेन्स असलेले मुखवटे मिळतात. मुखवट्याचे डोळे पूर्णपणे उघडलेले, तेजस्वी आणि करुणायुक्त असावेत.
जर तुम्ही मातीचे किंवा प्लास्टरचे मुखवटे घेत असाल, तर त्यावर केलेले रंगकाम सात्त्विक आणि नैसर्गिक असावे.
जर तुम्ही पितळ, चांदी किंवा तांब्याचे मुखवटे घेत असाल, तर ते कुठूनही तुटलेले किंवा ओरखडे असलेले नसावेत.