Gastric Problems : पोटात गॅस का होतो? पाहा गॅस्ट्रिक समस्येची मुख्य कारणे

Anuradha Vipat

सामान्य समस्या

पोटात गॅस होणे ही आजकालच्या जीवनशैलीतील एक अत्यंत सामान्य समस्या आहे.

Gastric Problems | Agrowon

सवयी आणि आहार

बऱ्याचदा आपण याकडे किरकोळ त्रास म्हणून दुर्लक्ष करतो, परंतु याची कारणे आपल्या रोजच्या सवयींशी आणि आहाराशी जोडलेली असतात

Gastric Problems | Agrowon

घाईघाईने जेवणे

अन्न नीट न चावता वेगाने खाल्ल्यामुळे जेवताना पोटात जास्त हवा गिळली जाते, ज्यामुळे गॅस आणि पोटफुगी होते.

Gastric Problems | Agrowon

जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ

अतिप्रमाणात तेलकट, तिखट किंवा जंक फूड खाल्ल्याने पचनक्रियेवर ताण पडतो आणि पोटात ॲसिडिटी वाढते.

Gastric Problems | Agrowon

गॅस वाढवणारे अन्नपदार्थ

कोबी, फ्लॉवर, हरभरे, बटाटे, सुका मेवा आणि काही प्रकारच्या डाळींचे पचन होताना पोटात जास्त वायू तयार होतो

Gastric Problems | Agrowon

कार्बनयुक्त पेये

सोडा, कोल्ड्रिंक्स किंवा बिअर यांसारख्या पेयांमध्ये कार्बन डायऑक्साइड असतो, जो पोटात गॅस निर्माण करतो.

Gastric Problems | Agrowon

धूम्रपान आणि च्युइंगम

सिगारेट पिताना किंवा च्युइंगम चघळताना शरीरात अतिरिक्त हवा शिरते, जी गॅस्ट्रिक समस्येला आमंत्रण देते.

Gastric Problems | agrowon

Sugarcane Juice : अमृतासारखा ठरेल उसाचा रस! रोज १ ग्लास पिण्याचे 'हे' अद्भूत फायदे

Sugarcane Juice | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...