Anuradha Vipat
गॅस बर्नर साफ करणे हे कधीकधी आपल्याला कठीण काम वाटते.
गॅस बर्नरवर अन्नपदार्थ पडून किंवा दुध उतू जाऊन ते चिकट होतात आणि काळे डाग पडतात.
गॅस बर्नरवरील डाग घालवण्यासाठी आणि बर्नर पुन्हा नव्यासारखे चमकवण्यासाठी तुम्ही आम्ही खाली दिलेली 'ही' सोपी पद्धत ट्राय करू शकता
लिंबाच्या रसात मीठ मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट बर्नरवर लावून १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर घासून धुवा.
जर डाग सौम्य असतील तर गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड घालून त्यात बर्नर अर्धा तास भिजवा आणि नंतर स्वच्छ करा.
बर्नरवर टूथपेस्ट लावून ब्रशने घासा आणि थोड्या वेळाने धुवा. यामुळे बर्नर चमकतात.
बर्नरची छिद्रे साफ करण्यासाठी नेहमी सुई किंवा टूथपिक वापरा.