sandeep Shirguppe
लसणाचा भाव गगनाला भिडल्याने लसूण उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा चांगला नफा कमावला आहे.
गेल्या वर्षी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना लसूण रस्त्यावर फेकावा लागला होता.
यंदा लसणाची लागवड कमालीची घटली. त्यामुळे उत्पादन घटून भाव वाढले आहेत.
देशातील लसणाचा सरासरी भाव २०० रुपये किलो आहे. लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते.
देशातील एकूण लसूण उत्पादनापैकी जवळपास ५० टक्के गेल्या वर्षी शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये किलो दराने लसूण विकावा लागला होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लसूण तिप्पट जास्त भावाने विकला जात आहे. अत्यंत कमी आवक हे याचे मुख्य कारण आहे.
बाजारात सुमारे २० हजार ते २५ हजार कट्टे लसणाची आवक होते. यंदा केवळ ८ हजार ते १० हजार कट्टे आल्याने लसणाला चांगला भाव आहे.