Anuradha Vipat
खालील दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही चवीला स्वादिष्ट अशी लसूण चटणी बनवू शकता.
लसूण पाकळ्या, लाल मिरच्या ,मीठ चवीनुसार, चिंचेचा लगदा ,तेल, मोहरी, जिरे, हिंग.
मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, लाल मिरच्या, चिंचेचा लगदा आणि चवीनुसार मीठ हे बारीक करून घ्या.
पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घालून फोडणी द्या
मोहरी-जिऱ्यात हिंग घाला . तयार झालेली फोडणी चटणीत मिसळून घ्या.
तुमची स्वादिष्ट लसूण चटणी तयार आहे
अधिक चवीसाठी तुम्ही चटणीमध्ये कोकमचा वापर करू शकता.