Anuradha Vipat
सध्या शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवासांमध्ये गरबा करायची यंग जनरेशनमध्ये क्रेझ आहे . हातात दांडिया घेऊन गरबा केला जातो.
आजच्या या मॉडर्न जमाण्यात गरबा खेळायच्या आधी त्याचा लूक कसा करायचा याबाबत कंफ्यूजन असते .
चला तर मग आजच्या या लेखात आपण बदलत्या जमान्यानुसार गरबा लूक कसा करायचा याच्या काही साध्या सोप्या टिप्स पाहूयात.
गरबा लूकसाठी तुम्ही पारंपरिक आणि आकर्षक पोशाख निवडा.
गरबा लूकसाठी मुलींनी जसे की घेरदार चोली आणि स्कर्ट किंवा लेहंगा परिधान करा.
तुमच्या लूकला साजेसे चांदीचे किंवा ऑक्सीडाईज्ड दागिने, कानातले आणि बांगड्या घाला.
गरबा खेळताना घाम येता त्यामुळे मेकअप खराब होऊ नये यासाठी तो लॉंग-लास्टिंग असणाराचं करा.