Anuradha Vipat
हिंदू पंचांगानुसार आज माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला म्हणून हा दिवस 'गणेश जयंती' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो.
माघ गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून 'ऋषीची भाजी दाखवण्याची जुनी परंपरा आहे.
रताळे, सुरण, बटाटा, अरबी (पिठलं), लाल भोपळा, पडवळ, गवार, भेंडी, मका ओला वाटाणा किंवा ओला हरभरा, ओलं खोबरं, ओल्या मिरच्या, आल्याचा तुकडा, जिरे, चिंचेचा कोळ, गुळाचा खडा, चवीनुसार मीठ, साजूक तूप.
सर्व भाज्या आणि कंदमुळे स्वच्छ धुवून चौकोनी तुकडे करा. हिरव्या मिरच्या, आलं आणि जिरे यांचे जाडसर वाटण करून कुकरमध्ये साजूक तूपात जिरे आणि मिरची-आल्याचे वाटण टाकून परता.
आता त्यात सर्व भाज्या टाका .त्यात चवीनुसार मीठ, थोडा गूळ आणि चिंचेचा कोळ घाला. पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर भाज्या नीट शिजवून घ्या.
भाजी शिजल्यानंतर वरून भरपूर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. गरमागरम ऋषीची भाजी, साजूक तूप आणि ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करा.
तुम्ही ह्या भाजीसोबत पुरणपोळीचा किंवा साध्या भाताचा नैवेद्य दाखवू शकता.