Mahesh Gaikwad
आजकाल जगभरात लठ्ठपणा हा चिंतेचा विषय झाला आहे. वाढत्या वजनामुळे अनेकजण चिंतेत आहेत.
वेगाने वाढणारे वजन ही आपल्या आरोग्यासाठी चिंतेची बाब असून यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
जर तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्येमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्याच कामाची आहे.
दैनंदिन जीवनात आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे फास्टफूड, जंकफूड खाणे. यामुळे शररीात चरबी वेगाने वाढते.
दुसरी चूक म्हणजे कोणतीही शारीरिक हालचाल न करणे. शरीराला थकवणारी हालचाल न केल्यामुळेही वजन वाढते.
रात्री उशीरा झोपण्याच्या सवयीमुळे झोप पूर्ण होत नाही. पुरेशी झोप न घेतल्यामुळेही वजन वाढते.
व्यायाम न करणे हेही वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.