Mahesh Gaikwad
गाजराचा ज्यूस हे एक उत्तम पेय असून पावसाळ्याच्या दिवसांत याचे सेवन केल्याने अनेक आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.
पावसाळ्यात सर्दी-खोकला, ताप आणि त्वचेच्या संबंधित आजार वाढतात. अशावेळी गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी वरदान ठरतो.
गाजरामध्ये व्हिटामिन ए आणि सी असते. तसेच यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे पावसाळ्यातील संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करतात.
गाजराचा ज्यूस त्वचेला आतून स्वच्छ करतो. यामुळे त्वचेवरील मुरूम, पुरळांची समस्या कमी होते.
गाजरातील बीटा-कॅरोटिन पावसाळ्यात कमी होणाऱ्या उजेडात डोळ्यांची काळजी घेते आणि दृष्टी सुधारते.
पावसाळ्यात अपचन, गॅस यासारख्या समस्या होतात. अशावेळी गाजरामध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.
गाजरामध्ये कॅलरी कमी असतात. ज्यामुळे शरीरात चरबी साठत नाही. परिणामी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
गाजराचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील हानिकारक विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.