FSSAI : एफएसएसएआयने भारतात बंदी घातली या पदार्थांवर बंदी

Aslam Abdul Shanedivan

खेसरी डाळ

हा डाळीचा एक प्रकार असून त्यातील विषारी घटकांमुळे लॅथिरिझम नावाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे १९६१ मध्ये एफएसएसएआयने यावर बंदी घातली.

FSSAI | agrowon

तंबाखू किंवा निकोटीन

तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून ते कर्करोगाला निमंत्रण देते. यामुळे FSSAI ने कोणत्याही खाद्यपदार्थात तंबाखू किंवा निकोटीन टाकण्यास बंदी घातली आहे.

FSSAI | agrowon

जीएम फूड्स

अनुवांशिकरित्या सुधारित पिके आणि खाद्यपदार्थांची लागवड आणि आयात यावर भारताचे कठोर नियम आहेत. यामुळे FSSAI ने त्यांच्यावर बंदी घातली आहे.

FSSAI | agrowon

कृत्रिम गोड पदार्थ

काही कृत्रिम गोड पदार्थ आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, म्हणून FSSAI ने केवळ सुरक्षित असणाऱ्याच कृत्रिम गोड पदार्थांना परवानगी दिली आहे. इतर सर्वांवर निर्बंध आहेत.

FSSAI | agrowon

पोटॅशियम ब्रोमेट आणि आयोडेट

ब्रेड आणि इतर बेकरी वस्तूंमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि आयोडेटचा वापर वापर केला जातो. यांना कर्करोगाचे कारण मानले जातात. त्यामुळे भारतात यावर बंदी आहे.

FSSAI | agrowon

खाद्य तेलात ट्रान्स फॅट

ट्रान्स फॅटमुळे हृदयरोग आणि इतर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे यावर देखील बंदी आहे

FSSAI | agrowon

चायनीज दूध आणि दुधाचे पदार्थ

चायनीज दुधात भेसळीसाठी मेलामाईन घातले जाते. जे विषारी रसायन आहे. त्यामुळे यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

FSSAI | agrowon

कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीन गॅस

याशिवाय फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीन गॅस या रासायनिक घटकांवर देखील भारतात बंदी आहे.

FSSAI | agrowon

Desi Ghee Hair : देशी तुपाचा केसांना नेमका कसा होईल फायदा

आणखी पाहा