Anuradha Vipat
किडनीच्या रुग्णांसाठी आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
रक्तामध्ये पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास हृदयाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण प्रचंड जास्त असते . एका मध्यम आकाराच्या केळीमधून शरीराला सुमारे ४२२ मिग्रॅ पोटॅशियम मिळते.
लिंबूवर्गीय फळांमध्ये आणि विशेषतः त्यांच्या ज्यूसमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते .
किवी हे फळ गुणकारी मानले जात असले, तरी यात पोटॅशियम आणि ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असते.
उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचे अतिसेवन किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे, कारण आंबा हा देखील उच्च पोटॅशियमयुक्त फळांच्या यादीत येतो.
मनुके, खजूर, जर्दाळू यांसारख्या वाळवलेल्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण एकाच जागी केंद्रित झालेले असते.