Dengue Disease : डेंग्यूमध्ये 'ही' फळे खा ; प्लेटलेट्स वाढतील झपाट्याने

Mahesh Gaikwad

पावसाळ्यातील आजार

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्या विविध आजारांचा संसर्ग होतो. सर्दी-खोकला, पोटदुखी, जुलाब यासारखे आजार या दिवसात होतात.

Dengue Disease | Agrowon

डेंग्यू, मलेरिया

याशिवाय डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि सध्या झिका सारख्या आजारांचाही धोकाही वाढला आहे.

Dengue Disease | Agrowon

डेंग्यूचा प्रादुर्भाव

पावसाळ्या डास चावल्यामुळे डेंग्यू हा विषाणूजन्य आजार होतो. एडिस इजिप्ती प्रजातीचा डास चावल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो.

Dengue Disease | Agrowon

डेंग्यूचा संसर्ग

डेंग्यूचा संसर्ग झाल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. परिणामी रुग्णाला खूप थकवा येतो. अशावेळी काही फळे खाल्ल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते.

Dengue Disease | Agrowon

संत्री

डेंग्यू झालेल्या व्यक्तीला आहारामध्ये संत्र्याची फळे खायला द्यावी. संत्रा फळामध्ये 'व्हिटामिन-सी'चे प्रमाण भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असतात.

Dengue Disease | Agrowon

किवी

किवी हे फळसुध्दा व्हिटामिन-सी ने भरपूर असते. डेंग्यू झालेल्या रुग्णाला ही फळे खायला दिल्यास लवकर बरे होण्यास मदत होते.

Dengue Disease | Agrowon

पपई

डेंग्यूच्या रुग्णांनी दररोज पपई खाल्ल्याने खूप फायदा होतो. याशिवाय पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्लाही दिला जातो.

Dengue Disease | Agrowon

पैपीन

पपईमध्ये पैपीन नावाचे एन्झाइम असते. जे शरीरातील प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत करते.

Dengue Disease | Agrowon

प्लेटलेट्सची संख्या

डेंग्यूच्या आजारामध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते. त्यामुळे रुग्णाच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असते.

Dengue Disease | Agrowon