Anuradha Vipat
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही फळे नैसर्गिक 'सुपरफूड' म्हणून काम करतात.
पपईमुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
केळी हे पचनासाठी सर्वात हलके फळ आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम असते.
सफरचंदामध्ये 'पेक्टिन' नावाचे विद्राव्य फायबर असते. हे फायबर आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.
पेरूमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर पेरू खाणे अत्यंत गुणकारी ठरते
पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी नाशपती प्रभावी आहे.
किवीमध्ये 'एक्टिनिडिन' नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिनांचे पचन सुलभ करते .