Anuradha Vipat
त्वचेला नैसर्गिक उजळण आणि चमक मिळवून देण्यासाठी महागड्या क्रीम्सपेक्षा फळे खाणे किंवा लावणे जास्त प्रभावी ठरते .
पपईमध्ये 'पपेन' नावाचे एंझाइम असते, जे मृत पेशी काढून त्वचा खोलवर स्वच्छ करते.
संत्री त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवतात. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा तरुण दिसतो.
लिंबू हे चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅनिंग कमी करून त्वचा चमकदार बनवते .
कोरड्या त्वचेला आर्द्रता मिळवून देण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी केळी उत्तम आहे
स्ट्रॉबेरीमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असते, जे मुरुम रोखण्यास मदत करते.
टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून त्वचेला हायड्रेटेड ठेवते.