Anuradha Vipat
घराच्या अंगणात फुलांची झाडे लावल्याने केवळ शोभा वाढत नाही तर वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नताही येते.
वास्तुशास्त्रानुसार, मोगऱ्याचे झाड लावल्याने घरातील तणाव कमी होतो आणि नात्यात गोडवा येतो .
अंगणात लाल किंवा गुलाबी रंगाचा गुलाब लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि सुख-समृद्धी मिळते .
जास्वंद हे गणपती बाप्पा आणि देवी मातेला अत्यंत प्रिय आहे [हे झाड लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते .
पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष मानले जाते . ज्या घरात पारिजातकाची फुले फुलतात, तिथे धन-धान्याची कमतरता भासत नाही .
चाफ्याचे झाड शुभ आणि ऊर्जेचा स्रोत मानले जाते ज्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते.
मधुमालतीला येणारी लाल-गुलाबी फुले अंगणाची शोभा वाढवतात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.