Anuradha Vipat
काही विशिष्ट फळांच्या बिया जेव्हा आपण चावून किंवा क्रश करून खातो, तेव्हा पोटातील एन्झाईम्सशी प्रक्रिया होऊन त्याचे रुपांतर हायड्रोजन सायनाइड या जीवघेण्या विषामध्ये होते.
चुकून १-२ बिया संपूर्ण गिळल्यास त्रास होत नाही, कारण त्या पचनसंस्थेतून न पचता बाहेर पडतात. परंतु, जर तुम्ही बऱ्याच बिया चावून किंवा वाटून खाल्ल्या, तर तीव्र विषबाधा होऊ शकते.
काही ठिकाणी कॅन्सर बरा होतो अशा चुकीच्या दाव्यांमुळे लोक या बिया खातात. परंतु, प्रौढ व्यक्तीने दिवसातून ३ पेक्षा जास्त आणि लहान मुलांनी एकही बी खाल्ल्यास सायनाइड पॉयझनिंगचा मोठा धोका असतो.
चेरी खाताना तिची बी चुकूनही दाताने फोडू नये. ती फुटल्यास लगेच विषारी घटक पोटात मुक्त होतात.
घरगुती ज्यूस किंवा स्मूदी बनवताना ही फळे बियांसकट मिक्सरमध्ये फिरवणे अत्यंत घातक ठरू शकते, कारण क्रश झाल्यामुळे विषारी घटक ज्यूसमध्ये पूर्णपणे मिसळतात.
रिकाम्या पोटी लिचीच्या बियांचे सेवन केल्यास चक्कर येणे, फिट्स येणे किंवा कोमामध्ये जाण्याचा धोका असतो.
सफरचंद, चेरी, किंवा लिची खाताना नेहमी बिया पूर्णपणे काढून टाकाव्यात, विशेषतः लहान मुलांना ही फळे देताना बिया नसल्याची खात्री करूनच द्यावीत.