Anuradha Vipat
श्रावणात उपवासासाठी फळांचे सलाड हा एक उत्तम पर्याय आहे.
तुम्ही तुमच्या आवडीच्या फळांचा वापर करून उपवासासाठी सलाड बनवू शकता.
उपवासासाठी सलाड बनवण्यासाठी केळी, सफरचंद, पेरू, डाळिंब, द्राक्षे, भाजलेले शेंगदाणे, उपवासाचे मीठ, काली मिरी पावडर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम सर्व फळे आणि पनीर लहान तुकडे करून घ्या त्यानंतर एका मोठ्या भांड्यात सर्व साहित्य एकत्र करा.
या सर्व साहित्यात चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर टाका. भाजलेले शेंगदाणे टाका.
त्यानंतर हे साहित्य हलक्या हाताने मिक्स करा व शेवटी फ्रिजमध्ये थंड झाल्यावर सर्व्ह करा.
जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही त्यात थोडे मध किंवा साखर टाकू शकता.