Swarali Pawar
यंदा हवामान बदलामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात करपला. त्यामुळे बागेत फळधारणा केवळ १० ते १५ टक्क्यांपर्यंतच राहिली आहे.
फ्रुट कव्हर म्हणजे फळांना कागदी किंवा नॉन-वोव्हन पिशवी घालणे. या पद्धतीला फ्रुट बॅगिंग असेही म्हटले जाते.
फळधारणा पूर्ण झाल्यानंतर कव्हर लावणे योग्य ठरते. फळाचा आकार ३ ते ५ सें.मी. म्हणजे टेबल टेनिस बॉलसारखा असावा.
फ्रुट कव्हरमुळे फळमाशी आणि अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. यामुळे फळे खराब होण्यापासून सुरक्षित राहतात.
कव्हरमुळे फळे थेट सूर्यप्रकाश आणि धुळीपासून सुरक्षित राहतात. यामुळे आंब्याला स्वच्छ आणि एकसारखा रंग मिळतो.
फ्रुट कव्हरसाठी कागदी किंवा नॉन-वोव्हन पिशव्या वापराव्यात. प्लास्टिक पिशवी वापरल्यास आत घाम येऊन फळ खराब होऊ शकते.
पिशवी फांदीला घट्ट बांधावी जेणेकरून ती वाऱ्याने उडणार नाही. परंतु बांधताना फळाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
फ्रुट कव्हर लावताना रोगट आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढाव्यात. यामुळे झाडाला हवा आणि प्रकाश मिळून फळांची वाढ चांगली होते.