Anuradha Vipat
हिवाळा हा पर्यटनासाठी सर्वात उत्तम आणि आल्हाददायक ऋतू मानला जातो.
यंदाच्या हिवाळ्यात फॅमिली किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर खालील सर्वोत्तम ठिकाणे तुमच्या ट्रिपसाठी नक्की निवडू शकता.
जर तुम्हाला प्रत्यक्ष बर्फवृष्टी आणि स्कीइंगचा आनंद घ्यायचा असेल, तर गुलमर्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात येथील डोंगररांगा पांढऱ्याशुभ्र बर्फाने झाकल्या जातात.
भारताचे 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखले जाणारे औली हिवाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. नंदा देवी पर्वतरांगांचे विहंगम दृश्य, बर्फाच्छादित उतार आणि स्कीइंगसाठी हे ठिकाण पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.
'गोल्डन सिटी'मधील सोनार किल्ला, सॅम सँड ड्यून्सवरील कॅमल सफारी, डेझर्ट कॅम्पिंग आणि राजस्थानी लोकसंगीताचा आनंद हिवाळ्यातच घेता येतो.
धुक्याने वेढलेले हिरवेगार चहाचे मळे, थंडगार हवामान, धबधबे आणि शांत निसर्ग यामुळे कपल्स आणि फॅमिली ट्रिपसाठी हे ठिकाण उत्तम ठरते.
पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात येथील धबधबे, स्वच्छ निळे आकाश, उमियम तलाव आणि लिव्हिंग रूट ब्रिज पाहणे हा एक अद्भुत अनुभव असतो.