Anuradha Vipat
आपल्या शरीरात साधारण ६०% पाणी असते, ज्यामुळे सर्व महत्त्वाचे अवयव व्यवस्थित काम करतात.
मात्र, कामाच्या घाईत किंवा सवयीमुळे अनेक लोक दिवसभरात पुरेसे पाणी पीत नाहीत.
जेव्हा शरीरात पाणी कमी असते, तेव्हा लघवी घट्ट होते आणि त्यातील शरीराला नको असलेले घटक बाहेर पडण्याऐवजी किडनीमध्ये जमा होऊ लागतात. यामुळे किडनी स्टोन तयार होतात.
शरीरात पाणी कमी असल्यास आतडे मळातील पाणी शोषून घेतात. परिणामी, मळ कडक होतो आणि बद्धकोष्टता व गॅसचा त्रास सुरू होतो.
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की रक्ताभिसरण मंदावते. यामुळे काहीही काम न करता सतत तीव्र थकवा जाणवतो, चक्कर येतात आणि दिवसभर डोके दुखू शकते.
पाणी कमी पिण्यामुळे त्वचा कोरडी पडते. चेहऱ्याची चमक नाहीशी होऊन पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्या अकाली दिसू लागतात.
पुरेसे पाणी न प्यायल्याने मूत्राशयातील जिवाणू शरीराबाहेर टाकले जात नाहीत. यामुळे लघवी करताना तीव्र जळजळ होणे, लघवीचा रंग गडद पिवळा होणे आणि यूरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो.