Anuradha Vipat
आपल्या शरीरात कोणताही आजार किंवा आरोग्य समस्या निर्माण झाल्यास, त्याचे संकेत शरीराचे विविध अवयव देत असतात.
नखांचा रंग, पोत आणि त्यांचा आकार आपल्या आरोग्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत देतात.
जर नखे खूप जास्त पांढरी किंवा फिकट दिसत असतील, तर शरीरात ॲनिमिया असण्याचे हे मुख्य लक्षण आहे.
नखे पिवळी पडण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे फांगल इन्फेक्शन. जर पिवळेपणा जास्त असेल आणि नखे जाड होत असतील, तर हे फुफ्फुसाचे आजार, थायरॉईड, मधुमेह किंवा सोरायसिस या आजारांचे लक्षण असू शकते.
नखांचा रंग निळसर किंवा जांभळट होणे म्हणजे शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाहीये.
जर नखे मधोमध चपटी होऊन त्यांचे काठ वर आले असतील , तर शरीरात लोहाची तीव्र कमतरता असल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे.
नखांवर आडव्या रेषा दिसणे हे शरीरात झिंकची कमतरता, तीव्र ताप किंवा गंभीर आजारपणातून शरीर बरे होत असल्याचे लक्षण आहे.