Anuradha Vipat
फ्रिजमध्ये विशिष्ट पदार्थ ठेवल्याने थेट 'कॅन्सरच्या गाठी होतात असा कोणताही थेट वैज्ञानिक पुरावा किंवा वैद्यकीय संशोधन नाही.
परंतु काही पदार्थ फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीने साठवल्यास किंवा जास्त काळ ठेवल्यास त्यामध्ये बुरशी, जीवाणू किंवा हानिकारक रसायने तयार होऊ शकतात.
बटाटे जास्त थंड तापमानात ठेवल्यास त्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते. म्हणून बटाटे नेहमी बाहेर कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवावेत.
लसूण सोलून ठेवल्यास त्याला ह्युमिडिटीमुळे बुरशी खूप लवकर लागते. बुरशीयुक्त अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते
एकदा कांदा कापल्यानंतर तो हवेतील ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे त्यावर बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि तो मऊ पडतो.
शिजवलेला भात २ तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहिल्यास त्यात बॅसिलस सेरियस नावाचे जीवाणू वाढतात.
अनेक लोक उरलेले गरम अन्न थेट प्लास्टिकच्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवतात. अन्न नेहमी काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यात ठेवावे.