Anuradha Vipat
मुलांची रोगप्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत विकसित होत असते यामुळे त्यांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो.
लहान मुलांचे शरीर नवीन विषाणूंशी लढायला शिकत असते. त्यामुळे त्यांना सहज संसर्ग होतो.
अचानक थंडी वाढणे किंवा पाऊस पडणे. अशा बदलत्या हवामानात विषाणू वेगाने पसरतात, ज्यामुळे मुलांना नाक गळणे किंवा खोकला सुरू होतो.
घरातील धूळ, फुलांमधील परागकण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा हवेतील प्रदूषण यामुळे मुलांना 'ऍलर्जिक ऱ्हायनायटिस' होऊ शकतो.
मुले खेळताना अनेकदा अस्वच्छ हातांनी नाक किंवा तोंडाला स्पर्श करतात. यामुळे जंतू शरीरात शिरतात.
जर मुलाला वारंवार खोकला येत असेल, तर ते टॉन्सिल्स वाढल्याचे किंवा दम्याचे लक्षण असू शकते.
मुलांना कोमट पाणी पाजा. आहारात हळद-दूध, आले आणि मधाचा समावेश करा.