Anuradha Vipat
त्वचेवरील 'टॅनिंग' काढून टाकण्यासाठी डी-टॅन अत्यंत प्रभावी ठरतात.
उन्हामुळे काळवंडलेली त्वचा मूळ रंगात येण्यास मदत होते.
डी-टॅनमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात, ज्यामुळे त्वचा अधिक ताजी, मऊ आणि चमकदार दिसते
नियमित डी-टॅन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन आणि असमान स्किन टोनची समस्या दूर होते
चांगल्या डी-टॅन पॅकमध्ये काकडी, पुदिना किंवा कोरफड यांसारखे नैसर्गिक घटक असतात, जे त्वचेला थंडावा देतात आणि आर्द्रता टिकवून ठेवतात.
सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. डी-टॅन हे नुकसान भरून काढण्यास मदत करते.
डी-टॅन हे त्वचेचा पोत गुळगुळीत करते त्यामुळे मऊपणा आणि गुळगुळीतपणा वाढवते.