Anuradha Vipat
गरम आणि कुरकुरीत फ्रेंच फ्राईज खायला आजच्या तरुण पिढीला खूप आवडतात. आज आपण त्याची रेसिपी पाहूयात.
बटाटे, बटाटे उकडण्यासाठी पाणी, तेल , मीठ , कॉर्नफ्लावर, काळा मीठ.
बटाटे धुवून, साल काढून, लांब आणि जाडसर फ्राईज आकारात कापा. फ्राईजला 15-20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून फ्राईजला टॉवेलने कोरडे करा.
पाण्यात मीठ घालून बटाट्याचे फ्राईज 2-3 मिनिटे उकळा. फ्राईजला जास्त कुरकुरीत करण्यासाठी, त्यावर कॉर्नफ्लावर आणि काळे मीठ टाका.
तेल चांगले गरम झाल्यावर त्यात फ्राईजच्या बॅचेसमध्ये सोडा आणि मध्यम आचेवर गोल्डन ब्राउन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
फ्राईज तेलातून बाहेर काढून पेपर टॉवेलवर ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल.
गरमा गरम फ्रेंच फ्राइज सर्व्ह करा आणि तुमच्या आवडीच्या सॉससोबत आनंद घ्या!