Kadboli Recipe : दिवाळी फराळ स्पेशल: पारंपरिक भाजणीची तोंडात टाकताच विरघळणारी कुरकुरीत कडबोळी

Anuradha Vipat

पारंपारिक फराळाचा पदार्थ

कडबोळी हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांत बनवला जाणारा एक अतिशय चवदार, खुसखुशीत आणि पारंपारिक फराळाचा पदार्थ आहे.

Kadboli Recipe | agrowon

चव आणि खमंगपणा

काळानुरूप हा पदार्थ आजकाल काहीसा विस्मरणात गेला आहे, पण त्याची पारंपारिक चव आणि खमंगपणा अप्रतिम असतो.

Kadboli Recipe | agrowon

कडबोळी

चकलीसारखीच दिसणारी पण चवीला पूर्णपणे वेगळी असणारी ही कडबोळी कशी बनवायची, याची अचूक रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

Kadboli Recipe | agrowon

साहित्य

कडबोळीच्या भाजणीसाठी- तांदूळ, चणा डाळ , उडीद डाळ, मूग डाळ, धणे, जिरे

पीठ मळण्यासाठी व तळण्यासाठी- तयार कडबोळी भाजणीचे पीठ, ओवा, सफेद तीळ,लाल तिखट, हळद, हिंग, कडकडीत गरम तेलाचे मोहन, मीठ, कोमट पाणी, तेल

Kadboli Recipe | agrowon

कृती

सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. कढईत तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ, धणे आणि जिरे मंद आचेवर स्वतंत्रपणे हलका सुवास येईपर्यंत कोरड्या भाजून घ्या. हे सर्व जिन्नस पूर्ण थंड झाल्यावर एकत्र करून गिरणीतून किंवा मिक्सरवर बारीक पिठासारखे दळून घ्या.

Kadboli Recipe | agrowon

पीठ मळणे

तयार भाजणीचे पीठ घ्या. त्यात ओवा , सफेद तीळ, लाल तिखट, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. कडकडीत गरम तेलाचे मोहन घाला. थोडे थोडे कोमट पाणी घालत घट्ट गोळा मळून घ्या. हे पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.

Kadboli Recipe | agrowon

कडबोळीला आकार देणे

पिठाचा एक छोटा गोळा हातावर घेऊन त्याचा पोळपाटावर किंवा हाताने एक लांब आणि मध्यम जाडीची वात/नळी बनवून घ्या. आता या वातीचे दोन्ही टोक एकत्र जोडून गोल रिंग किंवा कड्यासारखा आकार द्या आणि टोक व्यवस्थित दाबून लॉक करा. मंद आचेवर कडबोळी दोन्ही बाजूंनी छान खरपूस, बदामी-सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Kadboli Recipe | agrowon

Sweet Chirote Recipe : जुन्या पद्धतीचे खमंग साट्याचे चिरोटे: या खास ट्रिकने बनवा जिभेवर विरघळणारे खुसखुशीत चिरोटे!

Sweet Chirote Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...