Anuradha Vipat
सौफ , लवंग आणि दालचिनी यांसारख्या नैसर्गिक मसाल्यांचा नियमित वापर केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात.
लवंग आणि दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
सौफ आणि दालचिनीमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला स्वच्छ करतात, मुरुम कमी करतात, आणि त्वचेला चमक देतात.
दालचिनी इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.
दालचिनी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकते.
दालचिनी हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते.
दालचिनी आणि सौफ एकत्र घेतल्यास वजन कमी करण्यास मदत करू शकते.